Friday, February 21, 2014

Soup

                गणपतीचे दिवस आहेत , बाहेर छान थंडी आहे म्हटल्यावर माझ्या तब्येतीला काहीतरी  होणारच. आज  बराच ताप आलाय … काही दिवस सर्दी , खोकला अंगावर काढल्यामुळे आज सगळच एकत्र आलयं घरात काळजी घ्यायला कोणी नाही मग काय घेतली दर वेळेची माहिती असलेली औषधं . त्याची गुंगी आली आणि मग झोपलो , चार तासाने उठलो तेही गुंगीतच तेही या जाणीवेने कि आपल्याला एक भलं मोठं  पोट आहे आणि ते भुकेने फार आत गेलंय . मग कसाबसा उठलो आणि घराबाहेर निघालो . सूप प्यायचा प्लॅन केला . हॉटेल मध्ये गेलो अगदी ऐटीत सवई प्रमाणे एसी  मध्ये जाऊन  बसलो. मग मेनू कार्ड मागवून फार वेळ ते वाचून नेहमीप्रमाणे " वन बाय टू  क्रिम ऑफ टोमॅटो  सूप " अशी ऑर्डर दिली , मग कळल अरे चुकलंच  आपलं आपण एकटेच आलोय ,  त्या वेटर ला म्हटल एकच दे रे बाबा …


               आता थंडी जाणवू लागली , बाहेर धो-धो पाऊस सुरु झालेला आणि आत इथे एसी आणि माझ्याकडे छत्री किंवा विन्ची नाही त्यामुळे जाताना देखील भिजावं लागणार हि भावना अजूनच थंड देणारी … तेवढ्यात सूप आलं  मग छान पैकी गरम सूप पिताना थंडी पळून गेली पण त्या सूप बरोबर त्या सगळ्या सुप्स ची आठवण आली जे आपण (म्हणजेच मी ) वन बाय टू  घ्यायचो आणि त्या लोकांचीहि . त्यातले काही आता जगातच नाहीयेत तर  बाकीच्यातले काही  आता काँटॅक्ट मधे नाहीचेत आणि काही असून नसल्यासारखे आहेत . सूप पिता पिता विचारात मग्न झालो होतो , कुठेतरी दूर हरवलो होतो . तेवढ्यात वेटर आला ऑर्डर विचारायला आणि लक्षात आला सूप संपलय . मग काय मागवावं  ?  तूच मागाव काहीही मी खाईन असा म्हणायला समोर पाहिलं आणि लक्षात आला अरे आपल्यालाच मागवावा हवं . अक्खा सूप एकट्यानेच संपवल्यामुळे सूप नेच बर्यापैकी पोट भरलेलं  मग साधसच 'दाल-खिचडी'सांगितली . आता बराच वेळ होता मग आसपास जरा  नजर टाकली आणि मग बॅगेतून कादंबरी काढली आणि वाचत बसलो . जेमतेम चार पान  वाचून होतात तोच खिचडी आली .
             सुप नेच  पोट भरलेलं होतं त्यामुळे अर्धी खिचडी खाल्ली आणि पोट पूर्ण भरलं . उरलेली पार्सल सांगितली आणि फिंगर बाउल मध्ये हात बुडवून बसलो , ते पाणी अगदी गार होईपर्यंत मग बिल देऊन निघालो . मनात आला पार्सल घरी कोणाला देणार ? घरी आहेच कोण ? तेवढ्यात मीच म्हटला " विश्वचि  माझे घर " जो कोणी उपाशी गरीब दिसेल त्याला देऊ आणि निघालो चालत . आता फोन घरीच ठेवला होता त्यामुळे पूर्ण लक्ष बाहेर जगाकडे होता आणि हो मी गरीब उपाशी माणूस शोधत होतो . चालत चालत आता मी घरी पोचलो , मनात आलं  " माझ्यापेक्षा एकही गरीब उपाशी नाही ??? "
            हळूच म्हटलं प्रगती आहे अॅटलीस्ट गणपती मुळे  लोकं ' लंगर ' ठेवतायत ज्यात गरिबांची ' हंगर ' भागतेय . :-)